Skip to main content

माणसातील निसर्ग

माणसाच्या आतील निसर्ग  व प्राणी

प्रत्येक माणसात  अनेक प्रकारचे बीज दडलेले असतात .एकदा त्याला तसे वातावरण मिळाले की त्याचा अंकूर फूटतो व मग हळूहळू रोपटे वाढते व मग त्याचा वटवृक्ष होतो .वेळीच ते रोपटे उपटून फेकले नाही तर मग कठिण होते.राग हा प्रत्येकात असतो काही त्याला खतपाणी घालतात व शरीरात त्याचे झाड तयार करतात मग वेळ आली की तेच झाड समोरच्याला बरबाद करते व मग स्वत:माणूसच बरबाद होतो. लोभही आत लपलेला असतो त्यालाही खतपाणी दिले की त्याचेही झाड होते व असे फोफावते की आयूष्यभर माणूस लोभामुळे धावत सुटतो व स्वत:चा नाश ओढवून घेतो तसेच द्वेष  व मत्सराचे झाडेही आत छान वाढतात त्यांना खतपाणी दिल्यामुळे म्हणून कुणाचे चांगले झालेले बघवत नाही व तसा दृष्टिकोन तयार होतो व असा दृष्टिकोन माणसाला शांतीने जगू देत नाही पण आत सुगंधी झाडाचेही बीज असतात त्यांची निगा राखली तर स्वत:च्या जीवनात व दुसर्‍याच्या जीवनात सुगंध निर्माण करता येतो तसेच दया क्षमा शांतीचेही आत बीज असतात त्यांना योग्य रीतीने वाढवले तर मग सर्वच मंगलमय होते म्हणून आपल्या आत निसर्ग दडलेला आहे आपल्या हातात आहे की कोणत्या बीजाची वाढ करायची कुणाला खतपाणी घालून मोठे करायचे .काही आतील झाडे आपलाच नाश करतात तर काही आपले कल्याण करतात व दुसर्‍यांचेही .काही झाडांना मधूर फळे लागतात व त्याची गोडी आपल्या बरोबर बाकीही घेतात पण काही झाडांचे फळे एवढे कडू असतात की आपल्याबरोबर दुसर्‍यांचेही जीवन कडू करतात
             आत असलेल्या निसर्गात अनेक प्रकारचे प्राणी असतात मग आत नागाची वाढ होते व दिसेल त्याला माणूस त्रास द्यायला लागतो आत विंचूही असतो केव्हाही तो दुसर्‍याला चावू शकतो डूक्कर असतो त्याला त्याचे खाद्य मिळाले दारू सारखे तर माणूस त्याच्यासारखे गटारात लोळू लागतो .लबाड कोल्हाही असतो त्याची आत वाढ झाली की माणूस सतत खोटं बोलतो व लबाडीने वागतो मग बकरीही असते काही माणसात तिची वाढ झाली की नेहमी दुसर्‍याला घाबरूनच माणूस राहतो .वाघाची वाढ काहीमध्ये होते मग वाघासारखा बाणा व स्वाभिमान येतो व तसा वागतो .काही मध्ये बैलांची वाढ होते त्यामुळे जे मिळेल ते मुकाट्याने माणसं कामं करतात काहीमध्ये गाढवाची वाढ होते मग अक्कल सोडून काहीतरी बडबड करायची व मुकाट्याने काम करायची एवढंच माणसाला माहीत. काहीमध्ये कुत्र्यांची वाढ होते म्हणून सतत काही झाले की बकबक करत असतात व दुसर्‍यावर ओरडत असतात
  अशाप्रमाणे एखाद्याच्या वागणूकीवरुन तुम्हाला अंदाज बांधता येईल की त्याच्या आत कोणती झाडे वाढलीत व कोणत्या प्राण्याची वाढ झालेली आहे व तसेच आपल्यातही कोणत्या झाडांना व प्राण्यांना खतपाणी देवून वाढ केली हे समजून येईल बघा विचार करा व स्वत:ला व दुसर्‍यामध्ये शोध घेता येतो का बघा .बाहेर झाडे लावतो व प्राणी पाळतो पण आत आपण कोणती झाडे वाढू दिलीत व कोणते प्राणी जीवंत केलेत याचा माणूस कधीच विचार करत नाही असा विचार ज्यादिवशी सूरू होईल त्यादिवसा पासून माणूस चांगल्याच झाडांना खतपाणी देईल व चांगलेच प्राणी आत जीवंत करेल .बघा जमतं का
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...