आईबाबांचे मनोगत
आताच्या पिढीला आम्ही झालो नकोसे
फुटकळ कारण सांगून करतात तमाशे
हम दो हमारे दो असेच पाहिजे ह्ला पिढीला
पण हम दो हमारे सारे असे वाटायचे आम्हांला
मुलांना मोठे केले म्हणजे नाही केले आम्ही उपकार
पण आमचा सांभाळ करतांना विसरले ते संस्कार
आईवडिल म्हणजे झालेत आता मुलांना जड
दिवसातून बोलत नाही मुले आमच्याशी धड
मुलाचा रिमोट गेला त्याच्या बायकोजवळ
बटन दाबला की म्हणतो ,आहे गं तुझ्याचजवळ
आम्ही बनवले होते त्याला वाघासारखा
आता झाला तो मात्र शेळीसारखा
देवधर्म झाला त्याला आता नकोसा
बायकोचा पदरच झाला त्याला आडोसा
कसे आहात तुम्ही असे शब्द नाहीत त्याच्याजवळ
आटून गेले त्याचे सारे शब्द प्रेमळ
काय हवं काय नको हे ही विचारायला नाही सोय
बायको मुलांच्या प्रेमापोटी विसरला तो जन्माची माय
किती थोड्या दिवसात झाला बदल त्याच्यात
एवढ्या वर्षाचे संस्कार गेले सारे मातीत
आम्ही आता मागतो देवाचे बोलावणे
नको वाटते लाजिरवाने असे आम्हांला जिणे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment