एका आईचे रामास वाॅटस् अप मेसेज
प्रिय राम
आज तुझ्याजवळ मन मोकळे करावसं वाटतं म्हणूण तुला मी काहीतरी सांगते व विचारते .अरे तुझ्या वडिलांनी आईला दिलेल्या वचनासाठी तु कोणतेही आढेवेढे न घेता राजवस्र उतरवली व वनाचा रस्ता धरला पण आताचे मुले आईवडिल सांगून सांगून थकून जातात पण कोणताही शब्द मनावर घेत नाही व ऐकत नाही अरे थोड्या जमिनीसाठी एकमेकांचा खून करायलाही मागेपुढे बघत नाही भाऊ भाऊ एकमेकांचं तोंड बघत नाही संपतीसाठी भांडायला उठतात पण तू तर कोणताही हव्यास न ठेवता निघून गेलास वनवासात व भरतानेही तुझ्या पादूका गादीवर ठेवून राज्य केले पण आता चे भाऊ जर बघितले तर मलाच सर्व पाहिजे .मोठा भाऊ आहे म्हणून कोणता सन्मान नाही व लहान भाऊ आहे म्हणून त्याची काळजी नाही किती बदलले सारे हे .तुझा कोणताही आदर्श राहिला नाही .मुलेही तुझासारखा अभ्यांस न करता नुसता मोबाईल व टीव्ही बघण्यात वेळ घालवतात. तुझ्या नावाने मात्र राजकारण करून आताचे नेतेमंडळी लाभ उठवतात .रामा हे सर्व थांबव रे .सत्तेसाठी कोणत्याही थरालाही जाणारे काही लोक आहैत .आईवडिलांना वाटतं उगीच आपण मुलाला जन्म दिला कारण त्यांच्याप्रती कोणताही सन्मान राहिला नाही . म्हणून तू परत येवून काहीतरी कर भावा भावांमध्ये प्रेम निर्माण कर आईवडिलांचा सन्मान करायला शिकवं व .तु परत येशील व विस्कटलेली घडी परत बसवशील यासाठी असंख्य आईवडिल तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत
तुझे कसे रामराज्य होते आता शेतकरी आंदोलन करता आहेत आत्महत्या करता आहेत त्यांच्या मालाला भाव नाही तरूणांना नोकरी नाही .त्यामुळे ते परेशान आहेत नोकरदार आपल्या मागण्यासाठी संप आंदोलन करतात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत महागाई वाढते आहे सर्वसामान्याचं जीवन जगणं मुश्किल झालं आहे .आश्वासने दिलेली पूर्ण होत नाही. दुष्काळात गावं ओस पडत चाललीत पिण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे शहरात सर्वसामान्याच्या आवाक्यात घराच्या किंमती राहिल्या नाहीत. गुंडगिरी वाढली आहे .कुणाला कायद्याचा धाक नाही म्हणून चोर्या हाणामारी भ्रष्टाचार फोफावत चालला .
हे सर्व थांबवण्यासाठी तुझी गरज आहे राम. त्यामुळे तु लवकर येवून रामराज्य स्थापण कर व अवघ्या जनतेला आनंद मिळवून दे . आम्ही वाट बघतो आहोत सारे .कळावे. उत्तर पाठवण्यापेक्षा मेसेज मिळताच लवकर निघून ये
तुझीच माता
अपेक्षा
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment