छोटीशी चूक
जीवनात जेव्हा माणूस प्रगतीच्या शिखरावर असतो तेव्हा तो बेसावध होतो व त्याच्या हातून चूक होते व त्या चुकीची शिक्षा अशी मिळते की तो उध्वस्त होतो व एक कलंक त्याला चिकटतो सध्या गाजत असलेले प्रकरण स्मिथ व वाॅर्नर व त्यांचा साथी. त्यांची चूक त्यांना वाटली असेल की साधी आहे पण त्याची शिक्षा मिळताच जिकडेतिकडे बदनामी झाली तोंड दाखवायला लाज वाटायला लागली एवढी मोठी प्रतिष्ठा मिळालेली क्षणातच धुळीला मिळाली कारण ते बेसावध राहिलेत .पैसा व प्रसिध्दीमुळे माणसाच्या डोळ्यावर एक पट्टी किंवा पडदा येतो त्यामुळे वाईट करतो आहोत हे ही त्यांना समजत नाही आकाशात भरारी मारतात व चूक करून बसतात मग अशी काय शिक्षा मिळते की धाडकन जमीनीवर आपटतात त्यामुळे पैसा व प्रसिध्दी मध्ये जास्तच सावध राहायला पाहिजे कारण गरीबीत पैसा नसल्याने आपोआप सावधपणा येतो पण श्रीमंतीत बेसावधपणा वाढतो .अनेक श्रीमंताची मुले गाड्या अशा काय चालवतात की अपघात करून बसतात व मग जेलची हवा खावी लागते कारण असतो त्यांचा बेसावधपणा.पैसा असल्याने व्यसन लावून घेतात मग जुगार बायकांचा नाद यामुळे बेसावधपणातच त्याचा घात होतो व पूर्ण कुटूंबच उध्वस्त होते पैशांच्या गुर्मीत भांडणे उकरून काढणे व हाणामारी करणे व त्यात कुणाचा तरी जीव जातो .अशा रीतीने जीवनात गरीब असो किंवा श्रीमंत थोडीशी चूकही आपले जीवन बरबाद करू शकते व चांगल्या जीवनाला क्षणातच कलंक लागू शकतो त्यामुळे नंतर कितीही पश्चाताप केला तरी त्याचा उपयोग नसतो त्यामुळे विचार करा व सावधगिरीने पाऊल उचलावीत बघा जमतं का.
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment