कर्म
कर्माची गती आहे निराळी
कुणी न बोलता करतं
सगळीकडे असते कर्म चालू
तर कुणी करता करता बोलतं
कुणी कर्म करतात स्वत:साठी
दुसर्याचा कोणताही विचार न करून
काही करतात दुसर्यासाठी
स्वत:च्या सर्व इच्छा मारून
कर्मामुळे बर्याच वेळा
शिरतो माणसांमध्ये अहंकार
मी केले फक्त मी करू शकतो
असे बोलून नम्रपणाचा पडतो विसर
निस्वार्थ कर्म सर्वकाळी
आहे सर्व कर्मांमध्ये श्रेष्ठ
स्वार्थापोटी केलेले कर्म
फळ देण्यामध्ये ठरते कनिष्ठ
ठरलेले असते प्रत्येक कर्माचे
त्याच्या योग्यतेचे फळ
नाही सुटले आजपर्यंत कुणी
त्यासाठी यावी लागते योग्य वेळ
निसर्गातही फुले फुलतात
कोणताही बोभाटा न करता
जिकडे तिकडे लावतात पोस्टर
काम केले म्हणून सर्वांना सांगता
काम एक जण करतो पण
श्रेय दुसराचं कुणी घेतो
देवाकडे असतो न्याय
कर्म करणार्यालाच फळ देतो
कर्म लागले माणसापाठी
काही केल्या चूकत नाही
फळ ही असते ठरलेले
ते मिळण्यावाचून राहत नाही
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment