'🌹🌹रामनवमी🌹🌹
राम नाम घ्यावे राम नाम घ्यावे
जीवनाचे वर्म जाणून घ्यावे
एकवचनी एकपत्नी राम तो होता
वचनासाठी भोगला त्याने वनवासाचा रस्ता
धाडले राक्षसांना त्याने यमसदनी
आनंद निर्माण केला लोकांच्या मनी
हनुमानसारखा होता शूरवीर त्याच्याकडे
म्हणूनच सितामाईचा शोध लागला श्रीलंकेकडे
पहिला बांधला पूल भारत ते श्रीलंका
अन् पिटवला आपल्या पराक्रमाचा डंका
रावणा सारख्या शत्रूला केले ठार
बिभिषणासाठी मोकळे केले दार
रावणाला मारून सितामाईला केले मुक्त
त्यामुळे निर्माण झाले रामाचे भक्त
रामनाम आहे जीवनाचा आधार
अंतपणी होईल त्यामुळे आपली नौका पार
हरे राम हरे राम, राम राम हरी हरी
जप करावा हा सर्व प्रहरी
प्रा. दगा देवरे=-.......
Comments
Post a Comment