एप्रिल फूल
आज एक तारखेला पगार होईल
रविवार असला म्हणून काय झालं
समजावं एप्रिल फूल बनाया
बोलत नाही मुले उलटे आईबापाला
बसतात स्वत:हून रोज अभ्यांसाला
समजावं एप्रिल फूल बनाया
नको आहे मला मोबाईल
असे बोलले आज माझं मुल
समजावं एप्रिल फूल बनाया
मुले मदत करत होती आईला
म्हणतं होती टी व्ही बंद करायला
समजावं एप्रिल फूल बनाया
आज बाॅसने पाठीवर थाप मारली
कसा आहेस अशी विचारणा केली
समजावं एप्रिल फूल बनाया
गावात चोवीस तास वीज आहे
पाणीही सगळीकडे मुबलक आहे
समजावं एप्रिल फूल बनाया
दहावी बारावी परिक्षा झाली
कोणताही पेपर फुटण्याची बातमी नाही आली
समजावं एप्रिल फूल बनाया
एका वर्षी आंदोलने नाही झालीत
असे मित्र होता बोलत
समजावं एप्रिल फूल बनाया
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment