जेव्हा हरवते तेव्हा
हरवते नाते जेव्हा
तेव्हा किंमत त्याची कळते
असते आपल्या जवळ
कदर त्याची कधी नसते
हरवतो आपला मित्र
जातो आपल्या पासून दूर
जेव्हा होता जवळ
तेव्हा करत होतो अनादर
हरवते जेव्हा बालपण
तेव्हा रमतो त्याच्या आठवणीत
बालपण काळ हा सुखाचा
मोठे झाल्यावर कळतं
हरवतात जेव्हा पैसे
तेव्हा मन होते बेचैन
असतात जेव्हा खिशात
तेव्हा हलगर्जीपणा भरतो ठासून
जेव्हा हरवतो मोबाईल
तेव्हा सर्वच लुटलं जाते
असतो तो आपल्या जवळ
तेव्हा बेफिरपणे वागायला होते
हरवते जेव्हा तारुण्य
तेव्हा बरेच करायचे राहून गेले
होते जेव्हा आपल्या जवळ
तेव्हा स्वत;लाच श्रेष्ठ मानले
हरवते जेव्हा माणूसकी
तेव्हा माणूस बनतो जनावर
असते जेव्हा ती माणसात
तेव्हा माणसाचे नाव होते अमर
हरवते जेव्हा जगयची प्रेरणा
तेव्हा जिवंत असून माणूस मेलेला
ज्यांच्यामुळे मिळत होती प्रेरणा
त्यांना नाही जमलं सांभाळायला
हरवतात जेव्हा प्रेमाची माणसे
तेव्हा आठवतात त्यांच्या चांगल्या गोष्टी
होते जेव्हा ते आपले
तेव्हा काढत होतो त्यांच्यात त्रुटी
काही माणसांपासून जेव्हा दूर जातो
तेव्हा मनात येते शांतता
जेव्हा होतो त्यांच्या जवळ
तेव्हा सुख नव्हते वाटतं जेव्हा वाटते आता
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment