डाॅं. बाबासाहेब आंबेडकर
भारतावर आहेत ज्यांचे
मोजता न येणारे उपकार
ते व्यक्तिमत्व म्हणजे
डाॅंक्टर बाबासाहेब आंबेडकर
राज्यघटना लिहून त्यांनी
केली लोकशाही बळकट
दिला सर्वांना समान न्याय
सर्वांची बंद केली वटवट
मागासवर्गीयांचा उध्दार करून
स्वाभिमानाने जगायला शिकवले
शिक्षणाचा मार्ग दाखवून
त्याचे महत्व पटवून दिले
साहेबांकडे आहे पदव्यांचा
भरपूर चांगला खजिना
कितीतरी पुस्तके लिहून
अनेकांच्या खाली घातल्या माना
आयुष्यभर समाजासाठी झटून
नाही केला स्वत:चा विचार
गोरगरिबांचे होते दाता
आजही आहे त्यांचाच आधार
जातीभेद मिटवण्यासाठी
भरपूर केले त्यांनी प्रयास
सारे आयुष्य खर्ची घातले
सतत केला त्यासाठी प्रवास
अजून आयुष्य पाहिजे
होते डाॅंक्टर बाबासाहेबांना
जिवंत आहेत लोकांच्या ह्रदयात
हे विचारून बघा सर्वांना
असे साहेब पुढे कदापि
भविष्यात पुन्हा होणार नाहीत
असतील अमर तोपर्यंत
जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment