खरे खोटे
खरे आणि खोटे आहेत जीवनाच्या बाजू दोन
त्यांना ओळखणे असते मात्र फार कठिण
खरे खोटे आहेत दोन सख्खे भाऊ
ऐकमेकांना विचारतात आपण दोघे बरोबर जाऊ
खरे घेतो बर्याच वेळा खोट्याचा आधार
अन् खोटे करतो नेहमी खर्याला सादर
आजकाल बर्याच वेळा जिंकते खोटे
अन् खर्याला मारावे लागतात नेहमी खेटे
दिवसभरात खोटे बोलतो माणूस बर्याचवेळी
खर्याची दुनिया नाही हे अनुभवतो वेळोवेळी
लग्न झाल्या नंतर प्रमाण वाढते खोटे बोलण्याचे
त्याशिवाय पर्याय नसतो मग काय करायचे
सत्याचाच विजय ही आहे भ्रामक कल्पना
सध्या खोट्याचाच विजय हे माहीत आहे सर्वांना
बाॅसभोवती असतात खोटी चतूर माणसे
कान भरून तोडतात त्यांच्यापासून आपलीच माणसे
खरे बोलले नाही आवडत कुणाला
खोटी स्तूती भावते लोकांच्या मनाला
खरे वजनाला असते जड फार
खोटे पोहचते क्षणातच दूरवर
खरे जेव्हा हळूच बाहेर पडते
तेव्हा खोटं गावभर हिंडून आलेले असते
खर्याला सिध्द करण्यासाठी चढावी लागते कोर्टाची पायरी
द्यावी लागते भक्कम पुराव्यांची यादी कोर्टाच्या दारी
खर्याला द्याव्या लागतात कठिण परिक्षा
खोट्याला मात्र असते कुणाची तरी सुरक्षा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment