डोळे
प्रत्येकाला असतात डोळे विविध आकाराचे
दिसतात ते वेगवेगळ्या रंगाचे
विविध भाषा असतात डोळ्यांना
नजरेनेच खुणावतात समोरच्यांना
बायकोच्या डोळ्याची भाषा असते अवगत पुरूषांना
तिला काय म्हणायचे आहे हे कळते त्यांना
मुलेही आईच्या नजरेला घाबरतात
तिच्या डोळ्यांकडे बघून तसे वागतात
दारु पिण्यार्याचे डोळे दिसतात वेगळे
झोप पूर्ण न होणार्यांचे डोळे होतात निराळे
प्रियकराला प्रेयसीच्या डोळ्यात दिसते जग
लग्नानंतर त्याच डोळ्यात दिसते आग
डोळे म्हणजे सर्वात मौल्यवान दागिना
देवाने बहाल केला आहे तो नजराणा
डोळ्याच्या कडेला असतो महासागर
सुखदु:खाच्या वेळी येतो महापूर
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment