Skip to main content

बारा भानगडी

बारा भानगडी
जर आपण बघितले तर असे एकही घर सापडणार नाही तेथे भानगडी नाहीत .भानगडी ह्रा एकतर पतीपत्नीमध्ये असतात नाहीतर भावाभावांमध्ये असतात बहिणीमध्ये असतात आईवडिल व मुलांमध्ये असतात सासूसासर्‍यांबरोबर असतात काही भानगडी बायकोच्या भावाबरोबर असतात .भावजय ननंद यामध्ये असतात इतर नातेवाईकांबरोबर असतात तसेच भाऊबंदाबरोबर असतात काहीवेळा मित्रांबरोबर असतात काही भानगडी अनोळखी माणसांबरबर होतात काही भानगडी आपल्या बाॅसबरोबर होतात पण काही भानगडी स्वत:शी होतात
       अशा भानगडींचे कारण वेगवेगळे असते काही भानगडी संपती वरुन होतात काही भानगडी मानअपमानावरुन होतात काही पैशांच्या देवाणघेवाण वरून होतात काही आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी होतात काही भानगडी आपला विश्वासघात झाल्यामुळे होतात बर्‍याच वेळा भानगडी होतात त्या गैरसमजामुळे काही शुल्लक कारणाने होतात काही भानगडी अपशब्द वापरल्याने होतात.
         आता ह्रा भानगडी काही लगेच मिटतात तर काही कालांतराने मिटतात गैरसमज दूर झाले की काही मिटतात काही दु:ख आले की लोक जवळ येतात व मिटतात काही मात्र अक्राळविक्राळ रूप धारण करतात व कधीच मिटत नाहीत .पोलीस स्टेशन कोर्टकचेर्‍या सूरू होतात व संबंध अजूनच बिघडत जातात व मरेपर्यंत त्या मिटत नाही .विचार करा तुमच्याही कुणाबरोबर तू तू मैं मैं झालेच असेल व वरील कोणते तरी कारण असेल त्यामागे काही तुम्ही मिटवले असतील पण काही मात्र तुमच्या डोक्यातून जाणे शक्यच नाही व तुम्हाला गोडी व्हावी असे कधीच वाटत नसणार .काही भानगडींची सल विश्वासघाताची सल कायमची घर करून राहते व ते मिटावे असे कधीच वाटत नसणार पण ज्या भानगडी मिटाव्यात असे मनापासून जर वाटत असेल तर त्वरीत पावले उचला समोरचा फोन करील किंवा मिटवेल याची वाट न बघता स्वत:पुढाकार घ्या व मिटवा .बर्‍याच वेळा दुसर्‍याकडून जास्त अपेक्षा ठेवल्याने व त्याची पुर्तता झाली नाही की मग भानगडींचा उगम होतो.कोणत्याही भानगडी या वाईटच असतात पण काही व्यक्तीपासून दूर राहणे हेच शहाणपणाचे लक्षण व प्रगतीचेही लक्षण असते.बघा पटत का आणि जमतं का बघा.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...