जेल
क्रांतीकारी अभिमानाने जात होते जेलमध्ये
देशासाठी बलिदान देण्याची तयारी होती मनामध्ये
त्यांच्या पावलाने जेलही झाले होते मंदिर
देशभक्ती साठी झाले होते ते आतूर
देशासाठी दिले त्यांनी बलिदान
स्वातंत्र्यासाठी लढले जेलमध्ये राहुन
टिळकांनी लिहिला जेलमध्ये ग्रंथ गितांजली
सावरकरांनीही अनेक काव्य जेलमध्ये लिहिली
भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी जेलमध्ये दिला नारा
ठणकावून सांगितले भारत देश हमारा प्यारा
आता गुंड चोर भ्रष्टाचार्यांनी भरले आहे जेल
त्यांच्या मनाला वाटत नसेल काही सल
सज्जन लोक आजही घाबरतात जेलला
प्रामाणिकपणे महत्व देतात कामाला
समाज स्वच्छ दिसतो जेलमुळे
म्हणून सुरक्षित आहेत बायकामुले
निर्लज्ज लोकांना नाही वाटत भीती जेलची
किती तरी वेळा हवा खाऊन येतात त्याची
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment