श्रीमंतीत गरीबा सारखे जगणे
गरीबीमध्ये दिवस काढताना एक लिटर तेल एक महिना जायला पाहिजे असे करतात दोनच वेळा खातात नाष्टा माहित नसतो कमी खायला मिळते प्रत्येकाच्या वाट्याला दोनच चपाती येतात तुपाचे खायला मिळत नाही पाणी जास्त पितात कारण ते मुबलक असते
मग मोठे झाल्यावर नोकरी लागते हवे तेवढे पैसे घरात येतात खायची चंगळ होते दिवसातून कितीवेळा खातात याचे मोजमाप नसते मग भरपूर तेलकट तुपकट तसैच बाहेरचे पदार्थ खातात गोड पदार्थ तर विचारू नका .पार्टी वर पार्टी दिली जाते .परिणाम असा होतो की पोटाचा घेर वाढतो तसेच वजन प्रचंड वाढते मग अनेक आजारांचे माहेर घर होते वजनामुळे.डायबिटीस सारखे आजार जडतात मग डाॅक्टर सल्ला देतात गोड खाऊ नका तेलकट नको बाहेरचे पदार्थ नको .दोनच वेळा खा .कमी खा .मग तेल कमी खायला सुरवात करतात गोड पदार्थ वर्ज .चहा सोडतात .ग्रीन टी पितात भात खाणे टाळतात हे सर्व वजन कमी करण्यासाठी करतात पण वजन कमी होण्याचे नाव घेत नाही गरीबीमुळे खायला मिळत नव्हते व आता श्रीमंतीमध्ये पैसा असूनही जे हवं ते खाता येत नाही म्हणजेच श्रीमंतीत गरीबासारखे जीवन जगतात.वा रे वा जीवन .याचा अर्थ गरीबासारखे खाणेच शरीराचे खरे खाणे असते त्याने वजन वाढत नाही डायबिटीस होत नाही पोटाचा घेर वाढत नाही .जे गरीबासारखे खात नाही त्यांच्याकडे बघा जरा. पोटाचा घेर वाढला आहे पुढून मागून शरीराचा सर्वच भाग वाढला आहे वजनामुळे चालता येत नाही सुंदर राहूनही वजनामुळे बेढब दिसायला लागतात .वजनामुळे मांडी घालून बसता येत नाही पळता येत नाही .जिणे चढता येत नाही .चालताना धाप लागते. झोपताना त्रास होतो अनेक आजारांचे माहेरघर होते म्हणून गरीबासारखे जगणे होत नाही तोपर्यंत वजनाची समस्या मिटणार नाही .वजनामुळे कमी वयात वयस्कर दिसू लागतात .विचार करा व श्रीमंतीत गरीबासारखे जगणे जमतं का बघा त्यामुळे जगण्याचा वेगळाच आनंद मिळेल वजन जेव्हा कमी व्हायला लागेल तेव्हा जगण्याची नवीन उर्जा मिळेल व शरीराचे आरोग्य सुधारेल त्यामुळे मन ही प्रसन्न होईल व काम करताना थकवा जाणवणार नाही .खाणे व योग्य व्यायाम तसेच चालणे योगाभ्यास यामुळे जीवनाला नवीन दृष्टि मिळेल.बघा जमतं का
प्रा .दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment