ऐकावे जनाचे करावे मनाचे
पैसा असला की लोक म्हणतात
स्वत:ला समजतो गर्विष्ठ
नसला फारसा पैसा गाठीशी
तर लोक हिणवतात कनिष्ठ
शांतीने बसलो एका ठिकाणी
तर मंद म्हणून बोलतात
बोलायला लागलो भरपूर
तर बोलतात चरबी साठली त्याच्यात
स्वत:ची गाडी चालवली
तर म्हणतात आणली दाखवायला
एसटी ट्रेनने गेलो त्याच्याकडे
तर म्हणतात ऐपत नाही गाडी घ्यायला
मुले शिकून असली छान
तर बोलतात काय एवढं त्याच्यात
मुले निघाली बेजबाबदार
तर म्हणतात काय कमावले आयुष्यांत
शरीराने जाड झाले तर
बोलतात खाऊन खाऊन माजला
शरीराने किडकिडीत असले तर
म्हणतात मांस आहे का अंगाला
रंगाने गोरे असले तर
बोलतात भुरी आहे ती पाल
काळा रंग असला तर
म्हणतात आहे डांबराचा गोल
ऐकावे जनाचे करावे मनाचे
ऐकून न ऐकल्यासारखे करावे
घ्यावे तेच जे पटेल मनाला
आपल्या मनासारखेच वागावे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment