Skip to main content

आईबाबांचा हेतू

आईवडिलांच्या हेतुलाच क्षेद

प्रत्येक आईबाबांना वाटते आपल्याला अपत्य असावे  मग  मुलगा झाला की वाटते त्याला एकटे वाटू नये म्हणून त्याच्या जोडीला बहिण किंवा भाऊ असावा .जीवनभर एकमेकांच्या साठी धावून जाण्यासाठी हक्काचं माणूस असावं मग तसेच होते भाऊ किंवा अजून बहिण जन्माला येते काही घरात दोन्ही बहिणी असतात काही घरात दोन्ही भाऊ असतात काही घरात एक बहिण व भाऊ असे दोघे असतात काही घरात एकच मुलगी किंवा एकच मुलगा असतो काही घरात काहीच नसते तर काही जण लग्न करण्याच्या भानगडीतच पडत नाही  काही ठिकाणी दोन पेक्षा जास्त अपत्येही असतात .आता आईबाबा मुलांवर चांगलेच संस्कार करतात व वेळोवेळी सांगत असतात काही झाले तरी तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका मग एकत्र खेळणे एकत्र काम करणे एकमेकांशी भांडण करणे खोड्या करणे एकमेकांच्या वस्तु वापरणे एकमेकांची पुस्तके वापरणे एकमेकांना मदत करणे  एकत्र जेवण करणे दादा  दादा म्हणून बहिणीची प्रेमळ  हाक .ताई ताई म्हणून बहिणीच्या पुढेमागे करणे हे सर्व बघून आईवडिल सुखावून जातात व विचार करतात की आम्ही गेल्यावर असेच चित्र राहील .
     पण जसे जसे मोठे होतात तसेच प्रत्येकाच्या नशिबाने म्हणा की कर्तुत्वाने म्हणा आपली नोकरी किंवा धंदा प्रस्तापित करतात  मग लग्न करतात व तेथुनच हेवेदावे सुरू होतात माझे असे का व तुझे तसे का ?तू एवढा सुखी व मला सुख जास्त नाहीच .स्पर्धा सुरू व्हायला लागते .स्वार्थीपणा सूरू होतो आपआपले बघायला लागतात मदत केली तर  चारचौघात बोलून दाखवतात प्रेमाच्या ठिकाणी कोरडेपणा येतो मग प्रत्येकजण वेगळे होतात नंतर शेती घर पैसा यावरून भानगडी सूरू होतात कोर्टकचेर्‍या सुरू होतात मलाच पाहिजे अशी भावना तयार होते मदत केल्यावर परतीची अपेक्षा ठेवतात एकमेकांना मदत करणे म्हणजे उपकार करणे अशी भावना निर्माण होते. मारामारी करतात  गावाला  व शेजार्‍यांना फुकटचा तमाशा बघायला मिळतो त्याची कोणतीही लाज कुणालाच वाटत नाही आपल्या भावाचा व बहिणीचे मुले काय करतात हे ही माहीत नसते एवढी दरी निर्माण होते एकमेकांच्या घरी येणेजाणे नसते .जरी येणेजाणे राहिले तर आपल्या भावांनी किंवा बहिणींनी प्रगती केली त्याचा आनंद वाटत नाही .जळाऊ वृती निर्माण होते आईबाबांच्या हेतूलाच तडा जातो व त्यांच्या डोळ्यासमोर हा तमाशा घडतो त्यामुळे उगीचच एवढ्या मुलांना जन्म दिला असा पश्चाताप त्यांना येतो व मुकाट्याने सहन करतात ज्या मुलांना वाढवले तेच वाटणी करतात आईबाबांची. एकाकडे वडिल तर दुसर्‍याकडे आई .ज्यांना एकच अपत्य आहे त्यांचीही स्थिती एकदम वाईट .अमेरिका सारख्या शहरात पाठवून बिचारे एकटे जीवन जगतात त्यापेक्षा अपत्ये  जन्माला न येणे  हे बरे झाले असते असे वाटते म्हणून काहीजण लग्न करत नाही ते आजच्या जगात सर्वात सुखी असतात असे मला वाटते.
      पण काही ठिकाणी आईबाबांच्या हेतूसाठी मुले झटतात लहाणपणी जसे  प्रेम होते तसेच मोठेपणी ठेवतात एकमेकांच्या प्रगतीसाठी धावून येतात व एकमेकांच्या सल्याशिवाय काहीही करत नाही एकमेकांचा आधार असतो सर्व कार्याला एकत्र येतात व enjoy करतात.एकमेकांच्या प्रगतीबद्दल अभिमान बाळगतात .संपतीची वाटणी करतात सामोपचाराने घेतात .कुणालाही थांगपत्ता लागू देत नाही .असे प्रमाण फार नगण्य असते व ज्या ठिकाणी असे चित्र असते ते आईवडिल व त्यांचे अपत्ये भाग्यवानच समजले पाहिजे. काहीअंशी आईवडिलांवरही बरेच काही अवलंबून असते.बघा विचार करा तुमच्याकडे कसे आहे.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...