गाडी व आपण
ज्या माणसांजवळ स्वतची गाडी असते ते किती काळजी घेतात तिची. तिच्यात जेव्हा इंधन भरतात तेव्हा कुठूनही भरत नाही रस्त्यांत एखादा बोलला की माझ्या बाटलीत पेट्रोल आहे मी तुला दहा रूपये कमी देऊन पेट्रोल देतो तरी तुम्ही ते घेणार नाहीत कारण गाडी खराब झाली तर .मग तुम्ही पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरतात .एवढी गाडीची काळजी घेतात चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले गेले तर गाडी चालणारच नाही म्हणून पेट्रोलच आहे ना याची खात्री करूनच तुम्ही भरतात .जी गाडी खराब झाली तरी नवीन घेता येईल किंवा दुरूस्त करता येईल पण तरीही तुम्ही रिस्क घेत नाही
पण शरिरात सुध्दा इंजिनच आहे ते दुनिया मध्ये कुठेच मिळत नाही व त्या इंजिनची किंमत अनमोल असते त्या इंजिनच्या जिवावरच सर्व प्रगती करता येते तसेच शरिराचे स्वास्थ त्या इंजिनावर अवलंबून असते तरी सुध्दा रस्त्यांत जे मिळेल ते आपण खातो त्यात कुणी काय टाकले असेल कोणते तेल मसाला वापरला असेल याचा कोणताही विचार न करता त्या इंजिनाला आपण पुरवित असतो तसेच ते इंजिन ज्याने खराब होईल अशा गोष्टी त्याच्यावर लादत असतो मग कुणी त्याला तंबाखू दारू सिगारेट बिडी गुटखा गांजा सडक वरचे पदार्थ असे अनेक गोष्टींचा मारा करून इंजिन नादूरूस्त करण्याचे काम आपण रोज करत असतो व अनमोल असे इंजिन खराब करत असतो .जे इंजिन बाजारात कुठेच मिळत नाही .एक इंच जिभेवर ताबा मिळवता येतो का बघा.विचार करा व इंजिनाकडे लक्ष द्यायला व आरोग्यदायी राहावे कायम असे जमतं का बघा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment