जय हनुमान
जन्मला माता अंजनीच्या पोटी
आहे नाम राम तुझ्या ओठी
प्रभु रामाचा आहे तू सेवक सच्चा
हे जाणतो गल्लोगल्लीचा बच्चा
मारली उंच उडी श्रीलंकेला
सितामाईचा शोध तू लावून दाखवला
घेतला होता पंगा रावणाशी
कारण प्रभू राम होता तुझ्या पाठीशी
भल्या भल्या राक्षसांना लोळवले
आपल्या अचाट शक्तीने त्यांना आसमान दाखवले
संजीवनी आणून वाचवले प्राण प्रभू रामाचे
दाखवले सर्वांना शौर्य आपल्या शक्तीचे
सितामाईने दिलेला हार चावून दिला फेकून
त्याच्यात राम नाही असे दिले कारण सांगून
छाती फाडून दाखवले रामसिताचे स्वरूप
असा भक्त होणे नाही काळानुरूप
चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहशील अमर
तुझ्या जपाने तरतील लोक हा भवसागर
जय जय हनुमान की जय
जय जय श्रीराम की जय
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment