विषयांचे मनोगत
गणित म्हणतो मी आहे सर्वांचा राजा
माझ्यामुळे मिळते बर्याच जणांना सजा
इंग्रजी म्हणते मी आहे दिसायला सुंदर
पण माझ्याशी करतात बरेच जण वैर
सायन्स म्हणतो मी आहे विज्ञानाचा खजिना
शास्रज्ञांच्या शोधामुळे मी झालो महाराणा
इतिहास म्हणतो मी आहे भूतकाळ
मागच्या घटना जाणून घेण्यासाठी उतावीळ होतो वर्तमानकाळ
भूगोल म्हणतो माझे रूप खरे
माझ्यावरच उभे राहून देतात सर्व नारे
मातृभाषा म्हणतात खर्या राण्या आम्ही
आमच्या शब्दांबाहेर नाही तुम्ही
मानसशास्र म्हणते मी जाणतो मनाचे खेळ
म्हणून माझ्याशी घाला मेळ
तत्वज्ञान म्हणते मी आहे जीवनाचे खरे ज्ञान
माझा अभ्यांस म्हणजे जगण्याचा प्राण
तंत्रज्ञान म्हणते आम्हीच राजे सर्वांचे
काही क्षणातच प्रश्न सोडवतो महत्वाचे
पण सर्व विषय आहेत एकमेकांचे मित्र
सर्व एकत्र आल्याशिवाय नाही बनत सुंदर चित्र
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment