माणसे
माणसे असतात सगळीकडे सारखीच
राग लोभ अहंकार धरणारी
काही असतात माणसे
प्रेम आपुलकी जपणारी
काही असतात गोरे
तर काही असतात काळे
काही उंच काही बुटके
तर काही असतात निराळे
गरीब श्रीमंत ही दरी
असते सगळीचकडे
मित्र व शत्रूही असतात
कानाकोपर्यातल्या माणसाकडे
तुमचे विशेष कार्य बघून
असतात तुम्हाला डोक्यावर उचलणारी
झाली तुमच्याकडून कोणती चूक
हजर होतात तुम्हाला आपटणारी
भ्रष्टाचारी माणसे असतात
जगात विविध ठिकाणी
स्वच्छ कारभार करणारी
माणसेही दिसतात काही ठिकाणी
हेवेदावे करताना दिसतात
आपलीच जवळची माणसे
शेजारीही असतो सारखाच
कधी विचारत नाही तुम्ही आहेत कसे
दिसतात माणसे भेदाभेद
माणसांतच करणारी
आपणच आहोत श्रेष्ठ
असा अहंमपणा बाळगणारी
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment