बदललेले मित्र
जीवनात सुखदुख वाटण्यासाठी मित्र हे प्रत्येकालाच असावेत पण गंमत म्हणजे शाळेतले मित्र नंतर काॅलेजमधील मित्र बालपणी खेळातले मित्र नंतर नोकरी करत असताना भेटलेले मित्र असे अनेक मित्र मैत्रिणी असतात पण शाळा बालपण व काॅलैजमधील मित्र जीवनातील व्यस्त कामामुळे दुरावतात कोण काय करतो व कुठे आहे हे पण माहीत नसते पण त्याच्या बरोबर घालवलेले क्षण मात्र जसेच्या तसे आठवतात मग वीस पंचवीस वर्षानंतर अचानक भेट होते कुठेतरी व त्याला बघितल्यावर आपला विश्वासच बसत नाही की तो हा आहे म्हणून व त्याचाही आपल्यावर विश्वास बसत नाही कारण मागे आपण त्याला एकदम सडपातळ केसांची स्टाईल अशी त्याचे रूप डोळ्यात असते व आज पोट सुटलेले काहीचे टक्कल झालेले काहींचे केस सफेद झालेले असतात ओबडधोबड सगळीकडून वजन वाढलेले चेहर्यावर सुरकुत्या बरोबर त्याची बायको तसेच त्याची त्याच्या उंची एवढे मुले व एकदम सभ्य भाषा तोंडात असे बघितल्यावर तो मित्र हाच की असे वाटायला लागते व एवढा मोठा बदल एवढ्या वर्षामध्ये झालेला असतो आपल्यात व त्याच्यात .काही वेळा आपली मैत्रिण ही त्यावेळी आपल्याला छान वाटत असते व आज अचानक तिचे केस पांढरे झालेले नाजूक असलेली कळी एकदम भोपळ्या सारखी झालेली चेहर्यावर म्हातारं पणाचे लक्षण दिसत असलेली व बरोबर एकदम जाडजूड तिचा नवरा असे बघून मन आपले अस्ताव्यस्त होते व बेचैनी वाटायला लागते तसेच मनाला धक्का बसतो की एवढा मोठा बदल. आपल्या मनात असलेले तिचे रूप व आताचे रूप यात जमीन आसमानचा फरक आलेला असतो पण शेवटी बदल स्विकारणे भागच पडते .तुम्हालाही असा अनुभव आला का व तुमचेही मन अस्ताव्यस्त झालं का?
प्रा.दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment