आहे व नाही
आहे व नाही यातले अंतर फार क्षणिक असते. आहेच्या ठिकाणी जैव्हा नाही जोडले जाते तेव्हा आहेला काहीच किंमत उरत नाही.जोपर्यंत नाही जोडला जात नाही तोपर्यंत आहेचे वास्तव्य अमर वाटायला लागते.ती व्यक्ती आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टीना त्याच्या दृष्टीने किंमत असते मग त्याचा बंगला गाडी मालमत्ता त्याचे नातेवाईक पैसा नोकरचाकर त्याचा राग तोरा अहंकार त्याचे प्रेम त्याचे मित्र शत्रू त्याचे मिरवणे त्याचे कपडे त्याची नोकरी त्याचे राजकिय वजन हे सर्व त्याच्या दृष्टीने तेव्हाच खरे असते जेव्हा तो आहे .जेव्हा एखाद्या खोलीत रात्री दिव्याच्या प्रकाशात सर्व वस्तु स्पष्ट दिसतात पण दिवा बंद केल्यावर अंधारात काहीच दिसत नाही गंमत म्हणजे स्वत:ही स्वत:ला पाहू शकत नाही तसेच जेव्हा तो आहे तोपर्यंत त्याला वरील सर्व गोष्टी दिसतात व जाणवतात पण ज्यावेळी आहेच्या जागी नाही शब्द आला म्हणजे तो आता नाही तेव्हा त्याच्या दृष्टीने वरील गोष्टीना काहीही किंमत उरत नाही कारण तो आता नाही. म्हणून आहे व नाही शब्द सोपे वाटतात पण त्यांच्यात जमीन आसमानचे अंतर आहे. आहे हा प्रकाश तर नाही हा अंधार.जेव्हा माणूस आहे तेव्हा नाही व्हायला काही सेकंद लागतात.प्रत्येकाने नाही हा लक्षात ठेवला तरअहंकाराची भावना निर्माण होणार नाही.आहे मध्ये नाही बघायला शिकलात तर जगाकडे तसेच जगण्याकडे बघायची नवी दृष्टी मिळेल व म्हणू लागेल आहे पण नाही आहे. बघा पटतं का
प्रा. दगा देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment