Skip to main content

नियतीचे खेळ

नियतीचे  खेळ

लहानपणापासून जर बघितले तर नियती अनेक डावपेच आपल्या बरोबर खेळत असते व शेवटी तिच जिंकते लहानपणी खेळणे मुलांना फार आवडतात त्या खेळण्यामध्ये गुंतवून ठेवते त्यामुळे त्या खेळण्यातुन त्या बाळाला अपार आनंद होतो जरा खेळणे बाजूला झाले की लगेच रडायला लागते .त्या खेळण्यावर प्रचंड प्रेम असते त्याचे. पण हा आनंद कायम टिकणारा नसतो तो फक्त त्या वयात असतो मग थोडा मोठा झाल्यावर बाहेर खेळायचे वेड लागते मित्रमंडळी जमा करायचे व विविध खेळ खेळायचे व त्यातून आनंद मिळवायचा  त्यासाठी तहानभूकही विसरून जातो मग अजून मोठा झाल्यावर शाळा सूरू होते मग शाळेचे मित्र त्यांच्याबरोबर खाणे फिरणे अभ्यांस करणे यात तो अडकला जातो मोबाईल वरून एकमेकांशी तासन् तास गप्पा मारणे  .शिक्षक     परिक्षा  व मैत्रिणी याबद्दल चर्चा करणे यात वेळ जातो मग शिक्षण झाल्यावर नोकरी मिळण्यासाठी धडपड करणे त्यासाठी किती तरी वर्ष जातात मग नोकरीच्या प्रेमात पडतो त्यानंतर लग्न घरदार मुले बाळे  यात असा काही अडकतो की झपाझप वर्ष निघून जातात मग काही वर्ष आजारपणात जातात मुलांचे  शिक्षणासाठी आटापिटा करतो त्यांना सेटल करण्यासाठी धडपडतो मग असे करता करता स्वत:ची रिटायरमेंट  कधी आली हेच कळतं नाही मग रिटायरमेंट नंतरचे आयूष्य चांगले जाण्यासाठी पैशांची गुंतवणूक करतो काय कुठे किती पैसे ठेवायचे याचा विचार करतो मग बायको बरोबर फिरून यावे असे स्वप्न बघतो व तसे फिरूनही येतो पण वाढत्या वयामुळे तब्बेत साथ देत नाही तरी तडजोड करून दिवस ढकलत असतो मग सत्तरी पंचात्तरी जवळ येते .एके दिवशी सहज मित्रांबरोबर देवळात जातो तेथे कुण्या बाबाचे किर्तन चालू असते एक गंमत किंवा टाईमपास म्हणून तो किर्तनात बसतो बाबा सांगत असतात देवाबद्दल व आपण जन्माला आल्यावर आपले ध्येय काय असायला हवे व भजनाचे प्रार्थनेचे जपाचे महत्व बाबा सांगत असतात मग ते सर्व ऐकून याचे डोळे खाडकण उघडतात व यापैकी आपण काहीच कसे केले नाही व त्याचा अनुभव कसा नाही घेतला संसारात पंचात्तर वर्ष असेच धावपळीत निघून गेले मग आता किती उरला भजनाशी वेळ असा विचार करून आयुष्याचे गणितच चुकले असे त्याला वाटायला लागते ज्या मुलांसाठी केले ते ही त्याला विचारत नाही .मग पश्चाताप होतो त्याला .घरी येतो व काहीही न खाता झोपून जातो तो कायमचाच कधीही न उठण्यासाठी.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...