Skip to main content

सामान्यांची ताकद

सर्वसामान्य माणसांची ताकद
सामान्य माणसाकडे मोठमोठे लोक दुर्लक्षित करतात पण जगात जेवढे श्रीमंत असतील ते फक्त सामान्य माणसांच्या जीवावर अनेक नट लोक  करोडोपती आहेत कारण सिनेमा काढतात पण सर्वसामान्य माणूस सिनेमा बघायला जातो व गर्दी करतो तेव्हाच त्यांच्याकडे पैसा जातो जर सामान्य माणूस  बघायलाच गेला नाही तर मग सर्व कर्जात बुडतील .सरकार कुणाचे आणायचे हे जर सर्वसामान्य माणसांनी ठरवले तर त्या पक्षाचेच सरकार सत्तेत आणायची ताकद सामान्य माणसात असते पण सामान्य माणसाला नंतर गृहित धरलेच जात नाही. जेवढ्याही बॅका आहेत त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवावरच व अनेक उद्यौगपती बॅंकाकडून करोडो रूपयांचे कर्ज घेतात व काही कर्ज बुडवतात तर काही पळून जातात पण सामान्य माणूस दर महिण्याला कर्जाचे हप्ते न चुकता भरत असतो.महिण्याला येणार्‍या पगारावर इन्कमटॅक्स भरत असतो पण मोठमोठे व्यापारी उद्योगपती मोठमोठे डाॅक्टर खरंच इमानदारपणे टॅक्स भरतात का? विकासाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूसच आहे हे जर मान्य केले तर मग त्याला विविध सवलती देऊन त्याच्याकडून अनेक प्रकारचे  उद्योग चालू करुन देशाचा विकास साधता येईल .जेथून सरकारला पैसा येतो तो सर्वसामान्य माणसाकडूनच जास्त प्रमाणात येतो.सर्वसामान्य एकजूट झालेत तर कोणताही बदल करण्याची ताकद त्याच्यात असते व त्याची दखल ही घ्यावीच लागते .स्वातंत्र मिळाले ते सर्वसामान्य माणूस पेटून उठला म्हणून त्यामुळे सामान्य माणसाला आनंदी ठेवणे व त्याला सवलती देणे हे प्रशासनाचे काम आहे त्याच्या गरजा भागवणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे सामान्य माणसाला खूश ठेवले तर मग मत मागायची गरजच पडणार नाही. सामान्य माणसाच्या गरजा मोठ्या नसतात पेट्रोल डिझेल राॅकेल गॅसच्या किंमती  आवाक्यात असाव्यात तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ्यांच्या किंमतीही  परवडतील एवढ्या असाव्यात शेतमालाला खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा व तो कमीतकमी एका वर्षासाठी फिक्स असावा .मुलांनाही शाळैत प्रवेश सहज पैशांशिवाय मिळावा व शिक्षणानंतर लगेच नोकरी किंवा धंदा सहजच उपलब्ध व्हावा त्यासाठी ओळख व पैसा यांची गरज नसून गुणवत्तेवर त्याला नोकरी व धंदा मिळायलाच हवा.  मुबलक पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी मिळावे चोवीस तास वीज उपलब्ध असावी .प्रवास आनंददायी असावा   कुठेही ट्रॅफिकची समस्या नसावी  .वेळेवर पगार व्हावा संप व आंदौलन न करता सामोपचाराने प्रश्न निकालात काढता यायला पाहिजे. गुन्हेगारांना लगेचच शासन मिळायला हवे अशाप्रमाणे या गरजा कशा पार पाडता येतील तरच निवडणूकीला उभे राहावे .सर्व सामान्यांना निवडणूकीच्या वेळी जी आश्वासने दिलेली असतात ती जर पूर्ण करता येत नसतील तर मग पायउतार व्हावे कशाला खूर्चीला चिटकून बसायला हवे .ज्याच्यामध्ये कुवत आहे लोकांच्या गरजा पूर्ण करायची त्यांनीच उभे राहावे व त्यांनीच सरकार स्थापन करावे. जनता निवडून देते ते काही तुम्हाला एसी कारने व विमानाने फिरण्यासाठी नाही किंवा सात पिढ्यांसाठी संपती कमवण्यासाठी नाही की तुमचे जीवन ऐशारामात घालवण्यासाठी नाही तर जनतेचे जीवन ऐशारामात व्हावे व त्यांच्या गरजा तुम्ही रात्र पहाट करून पूर्ण कराव्यात स्वत: साध्या घरामध्ये राहून लोकांसाठी सुविधा पुरवाव्यात व जनतेचे राजे नाही तर जनतेचे सेवक म्हणून काम करावे व जनता तुमच्यामुळे सुखाचे दोन घास खातील  .जनतेचा वापर तुमची सेवा करण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी रात्र रात्र झोप लागायला नको  .रस्त्यावरील खड्डे वेळोवेळी बुजले गेले पाहिजेत. जनतेला  भेट तुमची सहज मिळावी.  जनतेच्या प्रत्येक पत्राला व मेसेजला उत्तर मिळायला हवे .जनतेच्या कराच्या पैशाचा हिशोब  मिळायला हवा.मागण्यांसाठी संप व आंदोलन कधीच व्हायला नको हे जेव्हा होईल तेव्हा  प्रचार करायची गरज राहणार नाही .आपोआप तुमच्या पारड्यात मतं पडतील .बघा विचार करा व पटतं का बघा

एक भारतीय नागरीक

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...