उंच त्याचा झोका
असते परिस्थिती विपरीत
तरी नाही डगमगत कुणी
देतात त्याला धीराने तोंड
आणि दाखवतात आपले पाणी
मग जातो उंच त्याचा झोका
नकारात्मक विचार घालतात
मनात चांगलेच थैमान
सकारात्क विचार करतात मात
शेवटी जिंकते त्याचे मन
मग जातो उंच त्याचा झोका
पैसे खिशात राहूनही
करत नाही उधळपट्टी
असतात जमिनीवर पाय
कारण सगळीकडे असते मोजपट्टी
मग जातो उंच त्याचा झोका
व्यसन नाही कोणते लावले
त्यापासुन राहतो चार पाऊले दूर
मित्रांच्या घराड्यात राहायला आवडते
त्यांनाभेटायला असतो कायम आतूर
मग जातो उंच त्याचा झोका
आईबाबां बद्दल असते
भरपूर प्रेम
त्यांची जोपासतो आवडनिवड
त्यांच्यासाठी बाजूला ठेवतो आपले काम
मग उंच जातो त्याचा झोका
सदा असते चेहर्यावर हास्य
बोलतांना असतो नम्रपणा
मदतीसाठी जातो कायम धावून
नसतो त्याच्यात भरलेला मीपणा
मग जातो उंच त्याचा झोका
करतो काम प्रामाणिकपणे
देतो कामाला न्याय
कामचुकारपणा नसतो त्याच्या अंगी
याशिवाय त्याला माहीत नसते काय
मग उंच जातो त्याचा झोका
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment