वजनाचा प्रश्न
आपण जर बघितले तर लोक बाहेरच्या गोष्टीत जास्त बोलत असतात पण स्वत:कडे बघायला वेळच नाही शंभर लोकांमध्ये जवळजवळ 90 लोक हे उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त वजनाचे दिसतील काही तर 30 ते 40 किलो वजन त्यांचे जास्त असते तसेच पोटाचा व मागचा घेर असा वाढलेला दिसतो की ऐन तारूण्यात वयस्कर दिसायला लागतात मग गुडघे दुखीचा त्रास बीपीचा त्रास हार्टचा त्रास चालण्याचा बसण्याचा फिरण्याचा झोपण्याचा त्रास सुरू होतात कारण वजन वाढवणे फार सोपे असते पण वजन आणि पोटाचा घेर हा कमी करणे एवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते कधी वजन एवढे वाढले हे कळतच नाही कारण उठूनसूटून खात सुटतो आपण. घरी नाही मिळाले तर बाहेर ताव मारत असतो मग हाॅटेलची पार्टी वडापाव मिसळपाव समोसे हे बिनधास्त खात सुटतो कधी वजनाची काळजी घेतच नाही मग असे काय वजन वाढते की नुसती हवा जरी घेतली तरी वजन कमी होत नाही वजनाने माणूस दहा वर्ष वयस्कर दिसायला लागतो . एकदा पोटाचा घेर वाढला की तो कमी होत नाही .हा लेख वाचत असताना स्वत:च्या पोटाचा घेर बघा व विचार करा का एवढा वाढवला वजन वाढणे व पोटाचा घेर वाढणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण नव्हे तर लवकर आयुष्य संपण्याचे लक्षण आहे असे समजा. जीवनात जर सर्व प्रगती शरीराच्या जीवावर करायची आहे तर मग ते निरोगी व मर्यादित वजन असणे फार गरजेचे आहे वजनामुळे अनेक आजारांचे माहेरघर आपले शरीर होते त्यामुळे नित्यनियमित आहार चालणे, योगा प्राणायाम ,दिक्षित सरांची पध्दत वापरली व बाहेरचे खाणे बंद केले तर नक्कीच वजन नियंत्रणात येईल यात कोणतीही शंका नाही .स्वत:वर विजय मिळवा वजन कमी करून व त्यामुळे निरोगी आयूष्य मिळेल व कुटूंब सुखी होईल बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
773860 1925
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment