ठेच
बसते ठेच प्रत्येकाला
कधीतरी जीवनात
ती एवढी बसेल
हे नाही येत मनात
ठेच बसल्या शिवाय
होत नाही माणूस शहाणा
असतो तो भ्रमात
मग शोधतो आपला ठिकाणा
ठेचाळल्यानंतर घेतो
जगताना सावधगिरी
त्याआधी असतो बेफिकीर
मग आठवते ब्रम्हगिरी
ठेच बसल्यावर हुशारी
येते हळूच बाहेर
ती होते लपून बसलेली
जवळ असून होती दूर
पुढच्याच ठेच होतो
मागचा शहाणा
असे असतात दुर्मिळ माणसे
ठेचच करते त्यांना मना
ठेच मधून शिकावा
जीवनाचा धडा
बुजून टाकावा कायमचाच
गेला होता आयुष्याला तडा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment