शेतकरी व नोकरी नसलेल्या मुलांचे रखडलेले लग्न
प्रत्येक गावात शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण मुली त्यांना द्यायला कुणी तयार नाही प्रत्येक मुलीला नोकरीवाला मुलगा पाहिजे त्यामुळे शेतकरी मुलांचा प्रश्न आ वासून उभा राहिला जे शेतकरी सधन आहेत ते स्वत: लाखो रूपये खर्च करून मुलाचे लग्न करतात मुलीच्या वडिलांकडून काही नको आहे पण जे गरीब किंवा मध्यम शेतकरी आहेत त्याच्या मुलांचे लग्न रखडले आहेत मग या मुलांनी काय करावे हाच प्रश्न त्यांच्या पालकांचा चिंतेचा विषय आहे मुलींच्या लग्नाची कोणतीही आता काळजी नाही पण मुलांच्या लग्नाची चिंता निर्माण झाली .बर्याच जणांना वाटते आपल्याला मुलगाच हवा त्यामुळे मुलींचे प्रमाण कमी झाले व ज्या मुली आहेत त्या शिकलेल्या असोत किंवा कमी शिकलेल्या त्यांना नोकरी करणाराच मुलगा हवा त्यामुळे खेडेगावात मुलांच्या लग्नाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला .हुंडा नको फक्त मुलगी हवी तसेच लग्नाचा खर्च पण पालक करायला तयार आहेत तरी शेतकरी मुलगा नकोच अशी परिस्थिती तयार झाली कारण शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला रोजच्या खाण्याचा प्रश्न तयार झाला तर मग येणार्या मुलीचे स्वप्न कसे पूर्ण करणार अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली जे मुले शिकलेले आहेत पण नोकरी नाही त्यांचाही लग्नाचा प्रश्न निर्माण झाला अशा मुलांनाही कुणी मुलगी द्यायला तयार नाहीत .पालक चिंताग्रस्त झाले आहेत .समाजात हा नवीनच प्रश्न उभा राहिला आहे यातून कसा मार्ग काढायचा हे कुणालाच सूचत नाही .तरूणपण त्यांचे वाया चालले आहे यातून डिप्रेशन मुलांमध्ये येवू शकते .काय करावे कुणालाच सूचत नाही .पाऊस वेळेवर नाही .दुष्काळ कायम नशिबाला पुजलेला असतो जरी पाणी असले तर मालाला भाव नाही अशा विचित्र कात्रीत शेतकरी सापडला आहे .बघा विचार करा व यातून ते कसे सुटतील ते जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment