गेटटुगेदरातील मजा
मजा आणली जितूने
अॅकरींग करताना
हसून हसून दुखले गाल
ते सर्व ऐकतांना
भारतीची दाद मनाला
सगळ्यांना भावली
वर्षाची मुद्देसूद भाषा
मनापासून आवडली
नंदाच्या उपस्थितीने
वातावरणात जान आणली
माया दुसरी भारती
संगीताने मैफिल रंगली
नितीनच्या मनसोक्त बोलण्याने
पार्टी रंगीन झाली
धर्मावरच्या विनोदाने
हसून हसून पोटदुखी झाली
भालेरावच्या प्रेमाच्या व्याख्येला
सर्वांनी दाद दिलीत
जिभाऊच्या बोलण्याने सगळेच
जागरूक झालीत
पुरूचे बोलणे खूप
आवडले सगळ्यांना
जुन्या मित्रांच्या उपस्थितीने
आनंद झाला सर्वांना
कापूरे संजय प्रमोद प्रकाश
सुनिल बर्याच वर्षानी भेटले
बागुल विजय अजून बरेच मित्र
आवर्जून उपस्थितीत राहिले
जे आले होते ते सर्व
आहेत उर्जेचा स्रोत
जे नव्हते आले त्यांनी
करावी पुढच्या वेळेस येण्याची बात
आज कसा मनाला
आनंद झाला
मित्रांना भेटल्यावर आला
हुरूप जगण्याला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment