राग एक राक्षस
बसला आहे लपून
आपल्या आत एक राक्षस
नाव आहे त्याचे राग
वेळ आल्यावर निघतो बाहेर हमखास
करतो उलथापालथ जीवनात
अन् रंग दाखवतो आपले
मिटवून टाकतो काहींचे अस्तित्व
भल्याभल्यांना संकटात टाकले
बाहेर तो येताच माणूस
विसरतो स्वत:ला
काय करतो याचे नाही राहात भान
हानी मात्र पोहचते स्वत:ला अन् दुसर्याला
रागामुळे भरले आहेत जेल
भोगत आहेत लोक शिक्षा
त्याच्यावर नव्हते नियंत्रण
म्हणून धुळीला मिळाली आशा
रागामुळे लोक गेले दूर
एका राक्षसाने केली कमाल
नाते सर्व संपवून
उडवून दिली त्याने धमाल
रागात होतात मारामार्या
दंगली आणि खून
प्रचंड उफाळून बाहेर करतो
अस्ताव्यस्थ सर्वांचे मन
रागाने सद् विवेकबुध्दी
होते त्यावेळी नष्ट
कमावलेले गमावून बसतो
वाया जातात कष्ट
रागात राहिले पाहिजे शांत
राग मारला त्याने वाघ मारला
रागाने भल्याभल्यांची होते फजिती
विसरतो माणूस परका अन् आपला
अन्याया विरूध्द आला
पाहिजे प्रचंड राग
रागानेही होते क्रांती
तेव्हा तो असतो चांगला राग
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment