आषाढी
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
विठ्ठल नामाचे भजन गाती
विठू हा त्यांचा मायबाप
करतात त्याच्या नामाचा जप
विठ्ठल म्हणता लागते ब्रम्हांनंदी टाळी
घ्यावे नाम त्याचे सर्वकाळी
आहे तो पंढरीचा राया
आला वैकुंठाहूनी भक्तांना भेटावया
त्याच्या दर्शनाने मिटतील पापं
तो आहे सर्वांचा माय बाप
विठ्ठल विठ्ठल मुखी घ्यावे नाम
मार्गी लागतील सगळे काम
झाला तो आतूर भक्तांसाठी
असतो कायम त्यांच्या पाठी
किर्तनात नाचून होऊ या दंग
धावत येईल माझा पांडुरंग
भक्तांसाठी आहे तो उभा विटेवरी
भेटायला जातात त्याला पायी वारकरी
आज करू या त्याच्या नावाचा उपवास
सगळीकडे आहे त्याचा वास
करू या मागणे त्याच्याकडे
पाऊस पाड सगळीकडे
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment