प्रवास
करत असतो प्रत्येक जण प्रवास
येतात त्याला विविध अनुभव
अनुभवातून माणूस जातो शिकत
शिकता शिकता फुलत जाते त्याचे वैभव
कुणी करतो प्रवास पायी
तर कुणी करतो सायकलने
कुणी जातात स्वत:च्या गाडीत
तर कुणी जातात विमानाने
प्रवासात भेटतात अनेकजण
बनून जातात खास मित्र
जुन्या मित्रांबरोबर होते नाते घट्ट
प्रवासात मिळतो निखळ आनंद मात्र
प्रवासाने बदलतो दृष्टिकोन
व्यापकता भरते नजरेत
स्वत:च्या अस्तित्वाची होते ओळख
माणूस बदलतो स्वार्थीपणा सोडत
प्रवास करावा निसर्गाच्या सानिध्यात
शिकावे निसर्गातून बरेच काही
परोपकाराची भावना घ्यावी त्याच्याकडून
मग स्वार्थी दृष्टिकोन उरणार नाही
प्रवासात पावसात चिंब भिजावे
धुवून टाकावते सर्व अवगुण
समुद्राच्या किनारी जावून
व्यापकतेचे करावे अवलोकण
जीवन हा एक असतो प्रवास
कुठे जायचे हे करावे पक्के
नुसते जायचे नसते चालत
नाहीतर पदोपदी बसणार धक्के
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment