आपले खरे नातलग
आपण आपले खरे नातलग जीवनभर बाहेर शोधत असतो .शोधता शोधता मिळाले असे वाटते व काहीतरी घडते व परत दुरावा निर्माण होतो पण खरे नातलग तर आपल्या जवळ आहेत पण आपले लक्ष नाही ते आपल्यासाठी अहोरात्र झटत असतात पण आपण त्यांना मान सन्मान देत नाही व त्यांची काळजीही पाहिजे तेवढी घेत नाही ते नातलग म्हणजे आपले इंद्रिय व शरीराचे अवयव .ह्रदय सतत आपल्यासाठी चालते म्हणून आपण जीवंत आहोत पण त्याला चालवण्यासाठी किती गोष्टी आपण करतो फुफूसे किती महत्वाचे काम करतात पण त्यांना काम करायला सहकार्य करण्याऐवजी आपण त्यांच्या कामात अडथळा निर्माण करतो बिडी सिगारेट गांजा दारू असे अनेक प्रकारचे व्यसने लावून त्याला कमकुवत करत असतो जठर अन्न पचन करण्याचे काम इमान इतबारे करते पण आपण त्याला काम करायला जास्तीत जास्त त्रास व्हायला पाहिजे यासाठी नको ते जड अन्न खातो किडन्या पण अहोरात्रं काम करतात पण त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण काय करतो. मेंदू तर आपला मित्र आहे तो आपल्याला बॅलन्स करण्यासाठी किती धडपडत असतो तसेच आठवणी जपून ठेवतो ज्ञान save करतो व हवे तेव्हा आपल्याला पुरवतो पण त्याला काम छान करण्यासाठी आपण काय करतो आपण अनेक वाईट विचार करतो वाईट कर्म करतो त्यामुळे त्याला काम करायला अडथळा निर्माण होतो व तो व्यवस्थित काम करत नाही हात पाय डोळे कान नाक आपले नातेवाईक सतत आपल्यासाठी कष्ट करत आहेत त्यांना चांगले काम करण्यासाठी आपण किती त्यांची काळजी घेतो म्हणून हे सर्व नातेवाईक आणि मित्र सतत आपल्या जवळ असतात एक क्षणही दूर जात नाही जर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली किंवा त्यांना ज्यामुळे त्रास होतो त्या गोष्टी टाळल्या तर ते आपल्याला उत्तम आरोग्य देणार व आपण खर्या अर्थाने सुखी होणार एवढे नातेवाईक आणि मित्र आपल्या एवढ्या जवळ असल्याने चिंता कशाला करायची. बस त्यांचा आदर करा ते तुमचा करतील
प्रा. दगाजी देवरे
7738601925
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment