माझा देव माझ्या बरोबर(आई)
जी माझ्या साठी आहे देव
ती आज आहे माझ्या बरोबर
मनाला वाटत आहे शांती
कारण देह व मन आहे एकाच जागेवर
झटली ती जीवनभर आमच्यासाठी
स्वत:च्या सुखाचा विचार न करता
अशिक्षित राहूनही तिने शिकवले
अपार कष्ट जीवनात झेलता झेलता
पै पै जोडून लावले
तिने पैसै आमच्या शिक्षणाला
आज ती भरून पावली
बघून आमच्या सुखी संसाराला
उपाशी राहून मातीशी ती
लढून सोने पिकवत होती
रात्रंदिवस काबाडकष्ट करुन
सुखाची झोप तिला मिळत नव्हती
वडिल गेले ते दु:ख बाजूला करुन
आमच्यासाठी मातीशी लढली
शेतानेही केला तिला सलाम
अन् तिच्या पुढे शरणागती पत्करली
काही केले तरी आईचे
पांग नाही फिटणार
अनेक जन्म घेऊनही
ते कर्ज कायम राहणार
आज ती आहे माझ्याबरोबर
म्हणून मी खूप आहे आनंदीत
तिचा आशिर्वाद मिळून
सुखी आहे जीवनात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment