पिंजरा झाला खाली
उडाला पक्षी पिंजर्यातून
झाला खाली पिंजरा
आला होता पिंजर्यात
फिरत होत्या त्याच्या जगात नजरा
मानत होता पिंजरा
म्हणजेच मी आहे
धावत होता पिंजर्यासाठी
आज सर्व पिंजर्याकडे पाहत आहे
पिंजर्यामध्ये राहून किती
करत होते कष्ट
सारखी चालली होती धावपळ
शेवटी पिंजराच झाला नष्ट
पिंजर्यात राहून किती किती
माणसे जोडली
आज पक्षी उडाला आकाशात
अन् पिंजराच झाला खाली
पिंजर्यात आला होता
थोड्या दिवसासाठी पाहूणा
पाहूणा गेला आपल्या घरी
ठेवून गेला सारा नजराणा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment