राखी
प्रत्येकाला एक तरी बहिण असावी
राखी बांधायला तिच्या कडून मिळावी
राखीमध्ये असावा प्रेमाचा ओलावा
तो भावाला बांधताच कळावा
नुसतीच राखी बांधायला बहिण नसावी
भावाप्रती निस्वार्थ प्रेमाची गोडी असावी
भावानेही द्यावे तिला संरक्षणाचे कडे
हाक मारताच त्याने धाव घ्यावी तिच्याकडे
बहिण भावात असावा विश्वास
संकट समयी धावून जावे हमखास
उणेदुणे काढून निर्माण करू नये दरी
खरे प्रेम राहावे जीवनभरी
कृष्ण द्रोपदीची गोष्ट आठवावी
निस्वार्थ गोष्ट मनात भरावी
भावाबहिणीसाठी मदत नसते उपकार
तो एक असतो कर्तव्याचा सोपस्कार
भावाबहिणीचे नाते ठेवावे पवित्र
हेवेदावे करून कटूता आणू नये मात्र
भावाबहिणींमध्ये पडू नये इतरांनी
त्यांना दृष्ट लावू नये कुणी
राखी पौर्णिमेच्या सर्व भावाबहिणींना शुभेच्छा
सर्वांना सुखी ठेवावे ही करतो इच्छा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment