Skip to main content

दान

,,दान
असे म्हणतात की आपण जे कमवतो त्यापैकी काही टक्के गरजवंताना दान केले पाहिजे   बरेच लोक दान करतात आता काही लोक पैशारूपी दान करतात काही वस्तूरुपी दान करतात काही स्थावर मालमत्ता दान करतात काही अवयव दान करतात  काही धनधान्य दान करतात अशा प्रकारे दान देण्याचे विविध प्रकार आहेत .काही दान देतात व ज्याला दान देतात त्याच्या बरोबर फोटो काढून जाहारात करतात की बघा मी किती दानशूर आहे व सगळिकडे बोलतात की अमक्याला एवढे दान दिले अमक्या संस्थेला एवढे दान करतो काहीमात्र भरपूर दान देतात  पण अट ठेवतात की मी दान केले ते कुणालाच समजणार नाही असे करा ते दान गुप्त असले पाहिजे माझे नाव कुणालाच कळता कामा नये बरैच जण आपले नाव न कळवता दान करतात आणि हेच दान सर्वश्रेष्ठ दान समजले जाते आपण दान करतामा उजव्या हाताने दिले ते डाव्या हातालाही कळणार नाही असे करावे जेव्हा जाहिरात बाजी करून दान केले जाते तेव्हा त्यि माणसात अहंकार येतो व सांगत सुटतो की बघा मी किती दानशूर आहे त्यि अहंकारामुळे दानाचे योग्य फळ मिळत नाही पण जे गुप्तपणाने दान दिले जातेत्याचे फळ कैकपटीने मिळते व पुण्य आपल्या संचितात जमा होते पण जाहिरात बाजी करून जेव्हा दान दिले जाते तेव्हा त्याचे  पुण्यांत रूपांतर होत नाही व ते संचितात जमा होतच नाही म्हणून दान करावे पण आपले नाव मोठे करण्यासाठी नाही तर गरजवंताला त्याचा फायदा व्हावा तुमचा उद्देम दानाचा जर तुम्हाला कुणी मोठे म्हणावे असे असेल तर त्याचे काहीही फळ मिळत नाही व उद्देश जर गरजवंताला मदत मिळावी माझे नाव मोठे नाही झाले तरी चालेल असे असेल तर नक्कीच फळ मोठे मिळते .जय श्रीकृष्ण
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...