अतिरेक
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकचं असतो .पाऊस जास्त झाला तर तो नकोसा वाटतो.खाणं जास्त झालं तर अजिर्ण होते.घरात कायम आपल्या माणसांबरोबर राहिले कामधंदा न करता तर ते ही कंटाळतात.पैसे जास्त झाले तर विविध कारस्थाने सुचायला लागतात व त्यांचा दुरूपयोग सुरू होतो.प्रेमाचा अतिरेक झाला तर भांडणे सूरू होतात क्षुल्लक कारणांवरून.मैत्रिचा अतिरेक झाला तर अपेक्षा वाढतात व पूर्ण नाही झाल्या तर लोक एकमेकांपासून लांब जातात.म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ती गोष्ट बिघडते त्यामुळे अतिरेक होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.अति तेथे माती म्हणूनच म्हण तयार झाली.अतिरेक विनाशाला कारणीभूत ठरतो म्हणून सावधानता बाळगावी.काही लोक व्यसन करतात पण अतिरेक करतात मग सावरणे कठिण जाते .कोणतीही गोष्ट परिपूर्ण मिळाली मग त्यातले सौदर्य नष्ट होते .म्हणून प्रत्येक गोष्ट करताना अति करू नये .ती गोष्ट नसल्याने हूरहूर वाटली पाहिजे .तिच्याबद्दल कायमआकर्षण वाटले पाहिजे .आपलेपणा वाटला पाहिजे.माणसाला अतिरेक करायला हाव कारणीभूत ठरते.त्याची लालसा कारण बनते व त्यामुळेच तो अतिरेकाचं टोक गाठतो.कुठेतरी स्वताच मर्यादा आखल्या तर मात्र अतिरेक होत नाही.अतिरेक हा पुराच्या पाण्यासारखा असतो म्हणजेच तो आला की सर्व नष्ट करत जातो .जेव्हा कळतं तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते म्हणून त्याआधीच सावध झालेलं बरे .बघूया जमतं का आपल्याला
प्रा. दगा देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
Comments
Post a Comment