घराची साफसफाई
घराची साफसफाई ही तर रोजच करावी लागते .जर समजा बाहेरगावी गेलो महिनाभरासाठी तर परत आल्यावर जळमंट तसेच धूळ कुबट वास झुरळं मुंग्या दिसायला लागतात मग आपण साफसफाई करायला घेतो तेव्हा कुठे फ्रेश वाटायला लागते .जरी घर बंद नसले व आठ दिवस साफ करू नका तरी धूळ जमा होते फॅनच्या पात्यावर जरा नजर टाका धुळीने माखलेले दिसतील तसेच खिडक्यावर धूळ बाथरूम चिकट झालेले दिसेल एसीमध्ये धुळ जमा झालेली दिसेल त्यामुळे प्रसन्न वाटायचे असेल तर वेळोवेळी आपण घराची साफसफाई करतो पण
शरीर हे सुध्दा एक आत्म्याचे घर आहे त्याची कधी करतो का साफसफाई ? बाहेरून आल्यावर हात पाय बरेच जण धूत नाही .बाहेरून आल्यावर हात पाय तोंड हे साफ केले पाहिजे तसेच दमून आला असला तर आंघोळ केली तर फ्रेश वाटेल व अशा क्रिया शरीराच्या बाहेरच्या आहेत आत शरीर साफ करण्यासाठी आपण काय करतो? शरीराला हवे असलेले सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळाले पाहिजे त्यामुळे पालेभाज्या शेंगभाज्या यांचा जेवणात सामावेश केला पाहिजे ड्रायफ्रूटस ही रोज खाल्ले पाहिजे भरपू र पाणी घेतले पाहिजे .सकाळी उठतांना कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायला पाहिजे मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे ज्या ज्या मोसमात जी फळे येतात ती भरपूर खाल्ली पाहिजेत पचन होण्यासाठी लिंबूचा वापर जेवणात करायला हवा पोटाला शिग लागेपर्यंत खावू नये बाहेरचे तळलेले तिखट पदार्थ व्रज्य करावेत ठरलेल्या वेळेत जेवण करायला हवे रात्री नऊच्या आत जेवण झाले पाहिजे .शरीरात पित्त अजीर्ण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी शरीराच्या विश्रांतीसाठी एखाद्या दिवशी फक्त फळे खावीत तसेच आठवड्यातून एक दिवस उपवास करावा त्यादिवशी एकदम कमी खावे
तसेच शरीराची साफसफाई करण्यासाठी प्राणायाम फार महत्वाचा आहे तसेच योगासने रोज करावीत त्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते आता मनाची सफाई करण्यासाठी चांगले वाचन करावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा देवाच्या नामाचा जप करावा .देवाचे भजन करावे .डोळे मिटून काही मिनिटे शांत बसावे त्यावेळी कोणताही विचार येणार नाही हे बघावे मुख्य म्हणजे फालतू बडबड करू नये मोजकेच पण मुद्देसूद शब्द वापरावेत ज्यामुळे मनात अशांतता निर्माण होईल असे कोणतेही काम करू नये चांगले काम केले तर झोपही शांत लागेल .अशांत मन असेल तर शांत झोप लागूच शकत नाही
अशा प्रकारे शरीररूपी घराची साफसफाई केली तर कोणताही आजार येण्याची हिंमत करणार नाही व जीवन जगतांना कंटाळा येणार नाही कायम उत्साह भरुन राहील बघा विचार करा व जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment