वेळ
नसते थांबत वेळ ही कुणासाठी
सारखी असते पळत
नाही विचार करत ती कुणाचा
नसते तिच्यावर कुणाची हुकमत
वेळ ही चांगलीच असते
देतात लोक तिला दोष
कुणावर नसते ती मेहरबान
पण काहींना मिळतो संतोष
काहीवेळा काळ येतो
पण आलेली नसते वेळ
लोकं वाचतात संकटातून
कारण तिने घेतली असते वेळ
वेळे बरोबर जमवावे
आयुष्याचे गणित
वेळ निघून गेल्यावर
कपाळावर मारावा लागतो हात
वेळेसाठी लागतं थांबायला
आपल्याला काही करण्यासाठी
आधीच घेतला निर्णय
तर तयार व्हावे परिणामांसाठी
वेळेने किती लोकं पाहिले
तिच्यासाठी असतात सारखेच
उगीच लोकं रूसतात तिच्यावर
ती सर्वांना देते योग्य न्यायच
शुभ अशुभ वेळ ही
आहे एक अंधश्रद्धा
तस खरचं काही नसतं
पक्की करावी आपली श्रद्धा
वेळात वेळ काढून तो
सार्थकी मात्र लावावा
त्याने होईल सर्वांचे कल्याण
अन् वेळेला नमस्कार करावा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment