मृत्यू
मृत्यू हा असतो प्रत्येकाला अटळ
झडप मारतो पाहून योग्य वेळ
मृत्यूने भल्याभल्यांना झोपवले
त्यातून बरेच लोक शिकले
मृत्यू हा ठरतो काहींना वरदान
काहींची उडवतो संसाराची दाणादाण
मृत्यूला पाहिजे असते फक्त निमित्त
मग करतो समोरच्याला फस्त
प्रत्येक गोष्टीचा होतो मृत्यू
तरी प्रत्येक जण करतो मी मी तू तू
मृत्यू भाग पाडतो विचार करायला
तोच संपवतो जीवनाला
जन्म शुरूवात तर असतो मृत्यू शेवट
तो कोणतीच स्विकारत नाही अट
गरीब श्रीमंत हा तो नाही मानत भेद
कुणाला देतो दु:ख तर कुणाला देतो आनंद
देतो यातनातून मृत्यू मुक्ति
तरी लोक करत नाही त्याची भक्ती
मृत्यूच्या विचाराने येते वैराग्य
हे फारच थोड्या लोकांचे असते भाग्य
मृत्यूने अनेक लोकांना नेले वैकुंठी
जन्म मरणाला दिली कायमची सुट्टी
सुंदरता कुरपता हे नाही तो मानत
वेळ आली की उचलायच हे त्याच ठरतं
मृत्यूच्या भयाने जातो अहंकार मान अपमान
म्हणून माणूस करतो देवाचे ध्यान
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment