नखरे पावसाचे
पाऊसा पाऊसा किती करतो रे नखरा
जेथे असते गरज तेथे घेतो रजा
काही ठिकाणी सारखा कोसळतो
अन् लोकांना होते तुझ्यामुळे सजा
बर्याच ठिकाणी पडल्या नद्या कोरड्या
शेतात पडल्या मोठ्या भेगा
बघतात तुझी सारखी वाट
तू देतो कायम त्यांना दगा
काही ठिकाणी घेतो रूद्र रूप
करतो सगळीकडे नासाडी
सगळीकडे भरते पाणीच पाणी
लोकं म्हणतात अरेरे वाहून गेली गाडी
पाण्यासाठी लोक होतात कासाविस
वाटतं नाही तेथे तुला जावसं
पाणी पाणी करुन बघतात आकाशाकडे
गरज नाही वाटतं तुला बघावसं
दारूड्या सारखा इकडे तिकडे भटकतोस
कुठे जातो याचे नाही राहिले तुला भान
का वागतोस असा विचित्र
नियंत्रण सोडून वागते तुझे मन
तुझे पद व्हायला पाहिजे खाली
तेव्हा येशील तू ठिकाणावर
भेदभाव घुसला तुझ्या अंगात
नाही तुझे डोकं भानावर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment