वाट बघणे
असते वाट बघणे चांगले
जे आपल्याकडे येणारे असते
वाट बघण्यालाही मर्यादा असतात
वेळ मात्र लवकर जात नसते
बघावी त्याची सतत वाट
जी जगायला प्रेरणा देईल
बघू नये त्याची कधी वाट
जो दु:खाच्या खाईत लोटेल
वाट बघता बघता मन भरून
येते त्याच्या आठवणीत
कधी त्याला एकदाचे भेटेल
असे सतत मनाला वाटत राहतं
सीतानेही बघीतली होती रामाची वाट
सोसले दु:ख श्रीराम नसल्याचे
गवळणीही झाल्या होत्या दंग
भजन गाण्यात श्रीकृष्णाचे
देव ही आतूर असतो भक्तांसाठी
बघत असतो त्यांची वाट
घेतो त्यांना तो आपल्या शिरपेचात
अन् डोळ्यातून वाहतात त्याचे आनंदाचे पाट
वाट बघावी पगाराची
असतो तो आपल्या कामाची पावती
बघावी वाट पाऊसाची
त्याने डोलतात झाडेफुले अवतीभवती
वाट बघते बाळ आपल्या आईची
असते संपूर्ण तिच त्याचे जग
आईही बघते वाट बाळाची
त्याच्याविना नाही धरू शकत ती तग
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment