वजन
वाटते प्रत्येकाला कमी होऊ नये
वजन आपले समाजातले
शरीराचे व्हावे वजन कमी
तेच असते आपल्या भल्याचे
करावी लागतात चांगली कामे
समाजातले वजन वाढविण्यासाठी
घ्यावी लागते चांगलीच मेहनत
स्वत:चे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी
समाजातील वजनासाठी करावा
लागतो लोकांचाच विचार
आपले वजन कमी करण्यासाठी
कष्ट घ्यावे लागतात स्वत:वर
समाजातील वजन वाढविण्यासाठी
पैसे खिशातून जातात
आपल्या वजनासाठी पैशांची
होते मात्र बचत
दोन्हीही वजन टिकवणे
फार सोपे नसते
वापरून विशिष्ट पध्दत
अंमलात आणायची असते
दोन्हीही वजनं आहेत
जगायला आधार
द्यावे लक्ष दोघांकडे
नाही तर होऊ निराधार
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment