आरसा
स्वच्छ आरशात बघून
विचारावा प्रश्न स्वत:ला
दिवसभर घडलेल्या घडामोडीत
किती स्वार्थ मी साधला
कुणा कुणाला हसवल
कुणाला केली मदत
कुणा कुणाला रडवलं
बघून विचारावे आरशात
काम करताना किती
दाखवला खरा प्रामाणिकपणा
आरसा खरे हेच सांगिल
सांगिल मारलेला कुणाला टोमणा
करावा आरसा साफ
माखलेला प्रचंड धुळीने
मग दिसेल खरे रूप
खोटे पडेल गळून तत्परतेने
आत ही एक असतो आरसा
विकारांनी बरबटलेला
स्वत:चे खरे रुप
दिसत नाही त्यामुळे स्वत:ला
ज्यांनी केला आतील आरसा साफ
ते झाले लोकं थोर
खूप कष्टांनी केले त्यांनी
विकारांना स्वत:पासून दूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment