मांडिले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू
मांडिले दिक्षित सरांनी दुकान
देतात मोलाविन सर्व वस्तू
सगळ्यांसाठी आहे दुकान खुले
कुण आणू नये मनात किंतू परंतू
सुरू केला सरांनी हा महायज्ञ
वजनात सुरू झाली आहे घट
लोक धावत आहेत सरांकडे
कारण वजन कमी होत आहे पटापट
डायबिटीसवर काढला आहे
सरांनी रामबाण उपाय
आपले दुकान बंद करण्याशिवाय
नाही उरला इतरांना कोणता पर्याय
बिन पैसाने होत आहे
लोकांना फायदाच फायदा
स्वत: अनुभवून करता आहे लोक
इतरांना वजन कमी करण्याचा वादा
लोकांना लुबाडून अनेकांनी
वजनापायी केला पैसा गोळा
पडतील त्यांची दुकाने ओस
कारण सरांच्या दुकानावर आहे सगळ्यांचा डोळा
सरांनी वाचवले अनेक लोकांचे
वजन अन् डायबिटीसमुळे जाणारे प्राण
हा प्रचार पोहचणार जगाच्या कानाकोपर्यात
ही क्रांती घडेल लोकांच्या मनामनात
लोकांचे वजन होत आहे कमी
अन् शिल्लक राहायला लागला पैसा
डायबिटीस काढतो आहे पाय
स्वत:ची हालत बघण्यासाठी शोधतो आरसा
श्री जिचकर साहेबही होतील आनंदी
पाहून त्यांचेच कार्य चालू आहे भारतात
भरभरून देतील दिक्षित सरांना आशिर्वाद
कार्य बघायला येतील ते कुणाच्या तरी रूपात
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment