मनिआॅर्डर
मनिआर्डर शब्द आहे
दिसायला खूप छोटा
पण अर्थ भरला आहे
त्यात खूप मोठा
लोक कमवतात पैसा
येऊन आपल्या शहरात
आपल्या माणसांसाठी
पाठवतात मात्र गावात
गावाकडे बघतात मनिआॅर्डरची
वाट अत्यंत आतुरतेने
तेवढाच असतो त्यांना आधार
म्हणून पाठवावी प्रेमळ मनाने
काही असतात मुले बेफिकिर
नसते काळजी त्यांना कुणाची
आपल्या व्यापात असतात दंग
तक्रार करतात नेहमी वेळेची
मनिआॅर्डर म्हणजे असते
कर्तव्याची जाणीव
आपल्यावर केलेल्या कर्तव्यावर
पाठवावी ती भरीव
मनिआॅर्डर आली की
नसतो आनंदाला पारावार
त्याची वाटणी करताना
कसरत करावी लागते भरपूर
पोस्टमन काका दिसले की
आठवते मनिआॅर्डर
अजून आली नाही म्हणाले की
येतो दु:खाने भरून ऊर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment