निकाल
निकाल येतो जस जसा जवळ
तस तसा जाता जात नाही वेळ
ह्रदयाची वाढत जाते धडधड
कुठे लक्ष लागत नाही धड
असतो मेहनतीवर भरवसा
दाखविल योग्य फळ तो आरसा
काहीवेळा विश्वासावर फिरतो नांगर
निकाल दाखवतो गाजर
निकाल बघताच काहींना होते आकाश ठेंगणे
काहीच्या नशिबी अपयश सारखे असते येणे
निकालामुळे मिळतो जीवनाला मार्ग
काही खचून धरतात आडमार्ग
निकाल म्हणजे नाही जीवन
अपयशावर मात करून खंबीर करावे मन
जीवनात बरेच निकाल लागतात
जिद् अन् मेहनतीवर सर्व अवलंबून असतात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment