ये रे ये रे पाऊसा
ये रे ये रे पाऊसा
केले रस्ते तू बंद
भरपूर तू बरसून घे
घरातच साजरा करतो आम्ही आनंद
जादा सुट्टी कधी मिळत नाही
तुझ्या हातात आहे सर्वांच्या नाड्या
आज झाले सर्व रस्ते जलमय
बंद पडल्या रेल्वे गाड्या
आज घरात खातो कांदाभजी
लिहितो लेख अन् कविता
बाहेर पडणे आहे आज कठिण
कारण बंद पाडला तु रेल्वेचा रस्ता
तुझ्यापुढे होतात सर्व नतमस्तक
तु आहे सर्वांचा राजा
तुझ्या रूद्र रूपाची आहे कल्पना
म्हणून घेतात बरेच जण रजा
येरे येरे पाऊसा नको थांबू जरासा
बरसून घे मनासारखा
भरून जाऊ दे सगळे धरणे
तुचं आहे सर्वांचा खरा सखा
अमर्याद साठा आहे तुझ्याकडे
नको करू कंजूषपणा
शेतावरही भरपूर बरस
तेथे दाखवू नको मीपणा
मुंबईवर बरेच आहे तुझे प्रेम
दरवर्षी करतो प्रेमाची बरसात
इतर ठिकाणी दाखवं तुझं प्रेम
का रे मुंबईशीच करतो प्रेमाची बात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment