वेळची किंमत
विशिष्ट वेळेची एक किंमत असते ती वेळ निघून गेल्यावर तिची किंमत कळते पण नंतर पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच नसते योग्य वेळी शिक्षणाकडे महत्व न दिल्यामुळे पुढे आयुष्यांत अनेक संकटांचा सामना करावा लागतो पण त्यावेळी त्या वेळेला किंमत न दिल्यामुळे पश्चाताप होतो तसेच जेव्हा हातात पैसे असतात तेव्हा पाहिजे तेवढी उधळपट्टी आपण करतो व जेव्हा गरज असते पैशांची व हातात नसतात तेव्हा त्या पैशांची किंमत कळायला लागते .आपल्या घरीही आपल्या माणसांना वाटेल ते बोलतो त्याचा अपमान करतो पण जेव्हा ती व्यक्ती कायमची निघून जाते तेव्हा त्या वेळेला तिचा केलेला अपमान आठवत राहतो पण तिला समजून घेण्यासाठी ती व्यक्ती नसल्याने आता काहीही उपयोग नसतो जेव्हा तब्बेत चांगली असते तेव्हा खाण्यापिण्याकडे लक्ष नसते काय खातो किती खातो केव्हा खातो याच्याकडे लक्ष नसते पण जेव्हा शरीराच्या तक्रारी चालू होतात तेव्हा त्या वेळेला शरीराकडे लक्ष न देण्याची किंमत चुकवावी लागते.मित्रालाही आपण गृहीत धरतो व जेव्हा तो दूर जातो तेव्हा त्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते तसेच पूर्ण तारूण्य निघून जाते व तारूण्यात अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतात पण त्यावेळीची किंमत नसल्याने बर्याच गोष्टी राहून जातात पण वेळ निघून गेल्यामुळे आता त्याचा काहीही उपयोग नसतो.घर घ्यायचे असते पण चालढकल करतो व वेळ निघून जाते आणि नंतर किंमती एवढ्या वाढतात की घर घेणे आवाक्यात नसते व पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही म्हणून वेळेची किंमत करायला पाहिजे म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही .विचार करा व जमतं का बघा
प्रा दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment